❖ तिला आधीपासूनच काय माहीत आहे हे जाणून घ्या. गैरसमज दूर करा. तुमच्याजवळ व तिच्याजवळ असलेली माहिती अचूक आहे की नाही याची खात्री करा.
❖ आपला अनुभव सांगा. पाळी सुरु होण्याआधीच्या स्वतःच्या अनुभवाचा विचार करून ती माहिती तुम्ही आपल्या मुलीला सांगता तेव्हा तुम्ही तिला फार आवश्यक असलेला भावनिक आधार पुरवत असता.
❖ काय करायचे याविषयी माहिती द्या. लहान मुली सहसा विचारतात त्या प्रश्नांपैकी काही प्रश्न म्हणजे, “शाळेत पाळी सुरू झाली तर काय करू?” “कोणत्या प्रकारचे पॅड चांगले?” “ते कसे वापरायचे?”
❖ वास्तविक माहिती साध्या भाषेत समजावून सांगा. तुमच्या मुलीच्या वयानुसार व समजशक्तीनुसार कोणती माहिती द्यायची ते ठरवा.
❖ पाळी सुरू झाल्यावरही माहिती देण्याचे थांबवू नका. पाळी सुरू होण्याआधीच तुम्ही आपल्या मुलीशी याबद्दल बोलायला सुरुवात केली पाहिजे आणि पाळी सुरू झाल्यानंतरही आवश्यकतेनुसार माहिती देत राहिले पाहिजे.