जय देवी जगदंबे । संकट देवा पडले ॥
इंद्रादि निर्जर जय जय वाणी ।
तुज स्तविती बद्धपाणी ॥ धृ. ॥
शुंभनिशुंभासाठी । 
सुर रिघती तव पाठी ।
प्रकट हिमाचळी होऊनि बाळा ॥
दैत्यदुष्टा मोहुनी सकळां ॥ जय. १ ॥
पहातसे दैत्यराणा ।
स्वरूपाची करी तुळणां ।
मोहित झाला खळ तव काये ॥
नच जाणोनि आदिमाये ॥ जय. ॥ २ ॥
दैत्यांचे सैन्य सारें ।
जाळूनियां हुंकारे ।
वीरा करुनी खंडविखंड ॥
प्रथम वधिलें चंडमुंड ॥ जय. ॥ ३ ॥
जन असुरी बहु पिडिले ।
रूप भयंकार धरिले ।
मग बळि महिषासुर खल वधिला ॥
तिन्ही लोकीं हर्ष झाला ॥ जय. ॥ ४ ॥
दैत्यवरें मत्त झाले ।
सुरशुत्रू निर्दळिले ।
ज्यांची त्याला स्थानें दिधलीं ॥
निर्दैत्य भूमि केली ॥ जय. ॥ ५ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel