दक्षिणदेशामाजि एक म्यां तुळजापुर पाहिलें हो ।
राज्य करी तुळजा साधुसंतांचे माहेर हो ॥
दर्शनास येती ब्रह्माविष्णु देव शंकर हो ।
दैत्यवर मोहिले हांकरीले दळभार हो ॥ १ ॥
जय जय अष्टभुजे अष्टायुध तुज शोभती हो ।
कर्णकुमारी माता तुळजापुरी ठाण तुझे हो ॥ धृ. ॥
घाव घातला निशाणी धो धो नगारे वाजती हो ।
नवकोटी कात्यायनि छप्पन्नकोटि चामुंडाहि हो ॥
औटकोटि भुतावळ आईचे संगे वर्णू किती हो ।
रण फार दाटलें रणी रणशिंगे वाजती हो ॥ जय. ॥ २ ॥
शिवगण लष्कर लढती अष्टभैरव क्षेत्रफळ हो ।
चौसष्ट योगिनी महाप्रचंड विशाळ हो व्याघ्रावरि ॥ 
बैसलीस माता तुळजा तूं विशाल हो ।
उदोकारे गर्जती समस्त चामुंडा मिळोनि हो ॥ जय. ३ ॥
यमुनागिरिपर्वती दैत्य महिषासुर मातला हो ।
अंबेच्या लष्करी तयाचा गणकोट वेढिला हो ॥
मारिला महिषासुर अंबा जाहली जयवंती हो ।
बोले त्र्यंबकराज अंबा माझी यशवंती हो ॥ जय. ॥ ४ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel