जय देवी मंगळागौरी । ओवाळीन सोनियाताटी ॥
रत्नाचे दिवे माणिकाच्या वाती । हिरेया ज्योती ॥ धृ. ॥
मंगळमूर्ती उपजली काया । प्रसन्न झाली अल्पायुषी राया ॥
तिष्टली राज्यबाळी । अयोपण द्यावया ॥ जय. ॥ १ ॥
पूजेला ग आणिती जाईच्या कळ्या । सोळा तिकटी सोळा परिची पत्री ॥
जाई जुई अबुल्या । शेवंती नागचाफे ॥
पारिजातके मनोहरे ।गोकर्ण महाफुले ॥
नंदेटे तगरे ।पूजेला ग आणिली ॥ जय. ॥ २ ॥
साळीचे तांदूळ मुगाची डाळ ।आळणी खिचडी रांधिती नार ॥
आपल्या पतीलागी । सेवा करिती फार ॥ जय ॥ ३ ॥
डुमडुम डुमडुम वाजंत्री वाजती । कळावी कांकणे हाती शोभती ॥
शोभती बाजुबंद । कानी कांपाचे गवें ।
ल्यायिली अंबाबाई शोभे ॥ जय. ॥ ४ ॥
न्हाऊनी माखुनि मौनी बैसली ।
पाटावाची चोळी क्षीरोदक नेसली ॥
स्वच्छ बहुत होउनी । अंबा पूजू बैसली ॥ जय. ॥ ५ ॥
सोनियाचे ताटी घातिल्या पंचारती । मध्ये उजळती कापुराच्या वाती ॥
करा धूप दीप । आतां नैवद्य षड्रस पक्वान्नें ॥
ताटी भरा बोनें ॥ जय. ॥ ६ ॥
लवलाहें तीघे काशी निघाली ।माउली मंगळागौरी भिजवूं विसरली ॥
मागुती परतुनीयां आली ।अंबा स्वयंभू देखिली ॥
देऊळ सोनियाचे । खांब हिरे यांचे ॥
वरती कळस मोतियांचा ॥ जय. ॥ ७ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel