ओवाळीन वोजा ॥ शिवसहजा, आदिभवानी गिरीजा , कल्लोलस्तरजा ॥
चारुभुजा, आई तुकाई तुळजा, शाकंभरिभर्गा ।
नवदुर्गा हिंगुळागिरिहिंगुळजा, निवासपुर लक्ष्मी ॥
महालक्ष्मी, कोल्हापुरपट्टणजा ॥ ओवा. ॥ १ ॥
मुका मीनाक्षी । कामाक्षी, सर्वही कर्नाटकजा, व्याध्रालयपुरजा ।
गुग्गुलजा, भिल्लीरंजितपूंजा, पठ्ठणपुरचंडी ।
श्रीचंडी निरहस्तेज:पुंजा, कोटीमुखज्वाला ॥
श्रीबाला, विमला मंगलागिरिजा ॥ ओवा. ॥ २ ॥
देई या भक्ती श्रीललिता, पुजिन मी सुखसरिता, अंबा डंबरजा ।
तळवटजा, युवहा मंडपमहजा विंध्याचलसदन ॥
ददिसदन, देवी यशोदातनुजा, तारा भुवनेशी ।
पंचदशी, ब्रह्मा नंदो दरिजा ॥ ओवा. ॥ ३ ॥
दर्याइंद्राक्षी । पिंगाक्षी, लंकांकित ऋषिवटिजा तैलंकोंकणजा ॥
पंकजजा, लवणा सुर मर्दने, अनेक पुरवणजा ।
अभितभुजा कारणरूपा विरजा, कालेश्रीघीषण ॥
त्रिविधगुण, सत्यद्रुमजा द्रमजा योगै: श्रीविद्या।
श्रीविद्या खिरडामाणिक गिरिजा ॥ ओंवाळीन ॥ ४ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel