शिवयन भ्रमर कमळिणी जय आदिशक्ती ।
षण्मुख गजमुख- जननी जय जय अव्यक्ती ॥
भवभेद भेषज लतिके दास प्रियभक्ती ।
रजतमसत्वां न कळे अगम्य तव शक्ती ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय श्रीअंबे ॥
ओंवाळूं आरती तुज भावें जगदंबे ॥ धृ. ॥
मोठा दुष्ट महातळिं महिषासुर झाला ।
फोडुनि निर्जरप्रतिमा त्रासवि विप्रांला ॥
भोगित सुंदर स्वबळेम नृपतीच्या बाळा ।
हरिहरब्रह्मा पाहुनि पळताती ज्याला ॥ जय. ॥ २ ॥
त्रासविलें गोब्राह्मण हें तूजला कळले ।
तत्क्षणिं भक्तहितास्तव प्रेमळ मन वळले ॥
अरिचमुमंडळ भडभड तवक्रोधें जळले ।
चरणतळें घुंघुरडें मळिले ॥ जय. ॥ ३ ॥
होउनि विजयी निर्जत स्थापियले स्वपदा ।
ऎशी तूं निजदासा नेशी दिव्यपदा ॥
अनन्य चिंतुनि तुजला गाती नित्ययदा ।
दास म्हणे त्या विपत्ति बाधेनाच कदा ।
जय देवी जय देवी जय जय श्रीअंबे ॥
ओंवाळू आरती. ॥ ४ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel