जय जय दुर्गे माते शांते चिच्छक्ते ।
पंचारति ओवाळूं तव पदिं कुलनाथे ॥ धृ. ॥
स्वेच्छे ब्रह्म तूं स्फुरणि प्रगटसि मूळमायें ।
विधिहरिहर हीं बाळें निर्मुनि भुवनाये ॥
उत्पतिर क्षणप्रळयां निरवुनि सम पाये ।
प्रक्रृतिपुरुषात्मक तूं वर्तसि इह न्यायें ॥ जय. ॥ १ ॥
ब्रह्मा भुवना निजवासा भक्तांस्तव त्यजुनी ।
निशुंभ शूंभादिक हे दानव संहरुनी ॥
क्रीडसि सर्वाभ्यंतरि तुरिये उन्मनीं ।
अपार तव गुण किती हे वर्णूं मि लघुवदनी ॥ जय. ॥ २ ॥
देवी शांता दुर्गा ऎशा अभिमानी ।
कैळोसीपुर येथें प्रसन्न राहोनी ॥
निजद्विज भजका स्मरणीं रक्षिसि धांवोनी ।
अनुचर मंगी शात्मज अनन्य तवचरणीं ॥
जय जय दुर्गे माते ॥ शांते. ॥ ३ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel