श्री अन्नपूर्णे देवी जयजय जगदंबे जननीं ।
तुज ऎसी देवता नाही कोणी त्रिभूवनी ॥ धृ. ॥
विप्र धनंजय त्याची भार्या सुलक्षण होती ।
ती दोघेही अनन्यभावे तव भक्ति करिती ॥
तुझ्य़ा प्रसादे झाली त्यांना पुत्राची प्राप्ती ॥
सुखशांती लाभली देवी ऎशी तव कीर्ती ॥ १ ॥
नरदेहाचें सार्थक होते तव पूजन करुनी ।
नामस्मरणे सकलही जाती भवसागर तरुनी ॥
जीवन जरि हें भरले आहे व्याधि - उपाधींनीं ।
प्रसन्न परि तू होता सारे भय जाते पळूनी ॥ २ ॥
छंद मनाला तुझा लागला मी करितो धांवा ।
धावुनी ये देंवते पाहुनी मम भक्तीभावा ॥
अखंड शाश्वत प्रेमसुखाचा दे मजला ठेवा ॥
जन्ममृत्यूचा फेरा चुकवी ठाव पदी द्यावा ॥ ३ ॥
तूं माझी माऊली जाण मी बालक तव तान्हा ।
क्षमस्व माते अपराधांची करूं गणना ॥
अन्नवस्त्र दे वैभव सारे सुखभोगहि नाना ।
मिलिंदमाधव करी प्रार्थना वंदुनी तव चरणां ॥ ४ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel