मागू शाश्वत सौभाग्याप्रति गौरीला ।
उजळू पंचारती तुजला ॥ धृ. ॥
जमू सगळ्याजणी एक स्थळी ।
सात्विक वृत्ती आणुनी चित्ती ।
आसन करु स्थित, मागू ॥ १ ॥
श्रावण मंगळवारी हिला ।
घालू स्नाने भरजरी वस्त्रे ।
कंचुक मौतिक मागू ॥ २ ॥
नेत्री अंजन घालू आधी कंठी भूषण हाती कंकण ।
नासी नथ मग, मागू ॥ ३ ॥
पंचामृती ते पुजन करु ।
कुंकुम अबिरा शेंदुर बुक्का ।
वाहू अक्षता, मागू ॥ ४ ॥
षोडस परीची पत्री आणू ।
खाज्या करंज्या जिलब्या ताज्या ।
नैवद्याप्रती, मागू ॥ ५ ॥
जन्मांतरीचे दु:ख हरी ।
जाऊ शरणा दृढ धरी चरणा ॥
कृष्णे समवेत, मागू ॥ ६ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel