जय देव जय देव जय वक्रतुंडा।
सिंदुरमंडीत विशाळ सरळ भुजदंडा॥ जय ॥धृ.॥
प्रसन्न भाळा विमला करिं घेवूनि कमळा।
उंदिरवाहन दोंदिल नाचसि बहुलील।
रुणझुण करिती घागरिया घोळा।
सतार सुस्वर गायन शोभित अवलीला॥जय॥१॥
सारीगपमधनीसप्तस्वर भेदा।
धिमकिट धिमकिट मृदंग वाजती गतिछंदा॥
तातग थैया करिसी आनंदा।
ब्रह्मादिक अवलोकिती तव पदारविंदा॥जय.॥२॥
अभयवरदा सुखदा राजिवरलनयना।
परशांकुशलड्डूधर शोभित शुभवदना।
उर्ध्वदोंदिल उंदिर कार्तिकेश्वर रचना।
मुक्तेश्वर चरणांबूजिं अलिपरि करि भ्रमणा।
जय देव जय देव जय.॥३॥
सिंदुरमंडीत विशाळ सरळ भुजदंडा॥ जय ॥धृ.॥
प्रसन्न भाळा विमला करिं घेवूनि कमळा।
उंदिरवाहन दोंदिल नाचसि बहुलील।
रुणझुण करिती घागरिया घोळा।
सतार सुस्वर गायन शोभित अवलीला॥जय॥१॥
सारीगपमधनीसप्तस्वर भेदा।
धिमकिट धिमकिट मृदंग वाजती गतिछंदा॥
तातग थैया करिसी आनंदा।
ब्रह्मादिक अवलोकिती तव पदारविंदा॥जय.॥२॥
अभयवरदा सुखदा राजिवरलनयना।
परशांकुशलड्डूधर शोभित शुभवदना।
उर्ध्वदोंदिल उंदिर कार्तिकेश्वर रचना।
मुक्तेश्वर चरणांबूजिं अलिपरि करि भ्रमणा।
जय देव जय देव जय.॥३॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.