श्रीगुरुदत्ता कांकड आरती ओवाळित आतां । तुजला ओवाळित आतां ।
भावें ओवाळित आतां । निद्रातीत जागृत असतां न येचि उठवितां ॥ध्रु०॥
माया वस्त्रांतुनि हे चिंधी सांपडली मजला । नरतनु सांपउली मजला ।
अवचित सांपडली मजला । वाया न जाऊं द्यावी म्हणुनी काकडा केला ॥१॥
विद्या अविद्या द्वैत उठतां त्रिपुटी उद्भवली । मायिक त्रिपुटी उद्भवली ।
सद्वस्तूचें स्मरणहि नसतां पीळ पडुनि गेली ॥२॥
मोहरुपें स्नेंहांत बुडवुनि ज्योती लावियली । स्वयंज्योती लावियली ।
परंज्योती लावियली । पाहुनि सद्गुरु बाबा राम म्हणे निशा सरली ॥३॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.