आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म । भक्तसंकटी नानास्वरूपीं स्थापिसी स्वधर्म ॥ धृ. ॥
अंवऋषी कारणे गर्भवास सोशीसी । वेद नेले चोरुनि ब्रह्मा आणुनिया देसी ।
मत्स्यरुपीं नारायण सप्तहि सागर धुंडीसी । हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी ॥ १ ॥
रसा तळाशी जातां पृथ्वी पाठीवर घेसी ।परोपकारासाठी देवा कांसव झालासी ॥
दाढें धरुनी पृथ्वी नेता वराहरुप होसी । प्रल्हादा कारणे स्तंभी नरहरि गुरगुरसी ॥ २ ॥
पांचवे अवतारी बळिच्या द्वाराला जासी । भिक्षे स्थळ मागुनी बळिला पाताळी नेसी ॥
सर्व समर्पण केले म्हणउनि प्रसन्न त्या होसी । वामनरूप धरूनी बळिच्याद्वारी तिष्ठसी ॥ ३ ॥
सगस्त्रार्जुन मातला जमंदग्नीचा वध केला । कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्रार्जुन वधिला ॥
नि:क्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला । सहावा अवतार परशुराम प्रगटला ॥ ४ ॥
मातला रावण सर्वा उपद्रव केला । तेहतिस कोटी देव बंदी हरलें सीतेला ॥
पितृवचना लागीं रामें वनवास केला । मिळोनी वानर सहित राजाराम प्रगटला ॥ ५ ॥
देवकी वसुदेव बंदी मोचन त्वां केलें । नंदाघरि  जाऊन निजसुख गोकुळा दिधले ॥
गोरसचोरी करिता नवलक्ष गोपाळ मिळविले । गोपिकांचे प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले ॥ ६ ॥
बौद्ध कलंकी कवियुगी झाला अधर्म हा अवघा । सांडुनि नित्यधर्म सोडुनि नंदाची सेवा ॥
म्लेंच्छमर्दन करिसी म्हणुनी कलंकी केशवा । बहिरवि जान्हवि द्याचि निजसुखा नंदसेवा ॥ ७ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to इतर आरती संग्रह