जयदेव जयदेव जय पंचायतना ॥ हरि हर भगवती गणपति चिन्मणि चिद्रत्ना ॥ध्रु०॥
क्षिरनिधिजापति शेषशयना गोविंदा ॥ नित्य निरामय सच्चित्सुखरूप निर्द्वंद्वा ॥
बाळ मुकुंदा परमानंदा सुखकंदा ॥ अर्तें आरति तुझिया चरणारविंदा ॥१॥
कर्पूरगौरा गिरिजारमणा महादेवा ॥ हर मृड शिव शंकर स्वामी नीलग्रीवा ॥
वेदश्रुति वदती तुज एकमेवा ॥ अर्ते आरति करिता घडली तव सेवा ॥२॥
चिच्छक्ती चिन्मात्रें तूं मूळ माते ॥ अनघ निजमुखसरिते स्वानंदभरिते ॥
करविरपुरवासिनि तूं कुळादैवते ॥ अर्तें आरति केली तुजला चित्सत्ते ॥३॥
मंगळमूर्ति गजानन प्रारंभीं स्तवितां ॥ सकलहि विघ्नें नासुनि हरिली तनु ममता ॥
म्हणवुनि भावें नमिलें तुज एकदंता ॥ आरति करितां झाली समसाम्यें समता ॥४॥
विश्वप्रकाशक अंबरमणि निजतेजाचा ॥ चिद्नगनीं तो उदयो होतां तम कैंचा ॥
परा पारुषली कुंठिट हे वाचा ॥ अभंय निज रंगें हा रंगविला साचा ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to इतर आरती संग्रह