आतां स्वामी सुखें निद्रा करा श्रीरंगा ॥ निर्विकारा विराधारा निर्गुण नि:संगा ॥ध्रु०॥
सहज समाधी शेजे आतां पहुडावें स्वामी ॥ सच्चित्सुखैकधामीं व्यापक सर्वांतर्यामीं ॥१॥
सुमनाच्या करुवारीं निजी निज गुरु राया ॥ अवस्थातीत साक्षित्वें नेईं देहबुद्धि विलया ॥२॥
नि:शब्द शब्दें चौधीजणी झाल्या निवांत ॥ एकपणाचा अंत कैंचें अद्वैतीं द्वैत ॥३॥
मी नाहीं तेथें तूं कैचा ह्मणावया ठाव ॥ ओतप्रोत अवघा तुझा तूं श्रीगुरुराव ॥४॥
निजानंदघन ब्रह्म सनातन अद्वय अभंग ॥ परात्परतर करुणाकर तूं परिपूर्ण रंग ॥५॥
स्वस्वरुपीं जागा निजीं निजेला ॥ नि:शब्दीं हा शब्द निमाला ॥४॥
रंगीं रंगला निजानंदघन ॥ योगीजनमनमोहन गरुवर्या ॥५॥

शेजार्ती. [यादवरावअप्पा यांचे पुत्न आनंदरावकृत.]
यावें विश्रांती यादवराया माहेरा ॥ श्रीरंगा विठ्ठला यावें गा मंदिरा ॥ध्रु०॥
नमो ईश दत्ता सदानंदा श्रीरामा ॥ अमलानंदा गंभिर ब्रह्मा सहज विश्रामा ॥१॥
पूर्णानंदा निजमूर्ती सद्रुरु सुखदाता ॥ एकादश अवतार श्रीरंगा तूं समर्था ॥२॥
आनंद हे गुरुपरंपरा विख्यात ॥ आनंद श्रीरंग चरणीं भाट गर्जत ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel