सुखें निद्रा करी आतां स्वामी गोविंदा, श्रीहरि स्वामी गोविंदा ॥
विनविति लक्षुमी लागुनि पादारविंदा ॥ राम ॥धृ॥
विवेक वैराग्य शमदमादि साधन ।
नारदल्लल्हाद घेउनिया भक्तजन ॥ राम ॥
मुमुक्षत्वें केलें नवविध भक्ती लागून
आपुलाल्या सदनासि गेले निजसमाधानें ॥ राम ॥१॥
श्रवणाचा मंनक उंची शेषाचा केला ।
मननाचीं सुमनें जोडुनि रचिलें शेजेला ॥ राम ॥
चिद्रत्नाचा दीप निजध्यासें उजळिला ।
अज्ञानाचा तम साक्षात्कारानें गेला ॥ राम ॥२॥
जीवशिवाचे कपाट दोन्ही एकत्र केले ।
असिपदाचें कुलूप त्याच्या वरुते लाविलें ॥ राम ॥
चिज्जडाच्या सूक्ष्म ग्रंथीं लागीं सोडिलें ।
आनंदाचे पडदे उकलुनि मोकळे केले ॥ राम ॥३॥
सोहंभावें करूनियां पूजाउपचार ।
निरंजन आरती ओवाळूनि वारंवार ॥ राम ॥
अद्वय चित्शक्ति सेवेलागीं सादर ।
सुखासनीं पहूडले लक्षुमीवर ॥ राम ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel