(१)
होतां कृपा तुझी पशु बोले वेद । निर्जीव चाले भिंती महिमा अगाध । भगवद्गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध । करुनी भाविक लोकां केला निजबोध ॥१॥
जय देव जय देव जय ज्ञानसिंधू । नामस्मरणं तुमच्या तूटे भवबंधू ॥ध्रुव०॥
चौदाशें वर्षांचे तप्तीतीरवासी । येउनि चांगदेव लागति चरणांसी । करुनी कृपा देवें अनुग्रहिलें त्यांसी । देउनि आत्मज्ञान केलें सहवासी ॥२॥
समाधिसमयीं सकळ समुदाय । घेउनि सुरवर आले श्रीपंढरिराय । द्वारीं अजानवृक्ष सुवर्णपिंपळ असुमाय । जाणोनि महिमा निळा चरणातळिं राहे ॥३॥

(२)
आरती ज्ञानराजा । क्महा कैवल्यतेजा । सेविती साधुसंत । मनु वेधला माझा ॥ध्रु०॥
लोपलें ज्ञान जगीं । हित नेणती कोणी । अवतार पांडुरंग । नाम ठेविलें ज्ञानी ॥१॥
कनकाचें ताट करीं । उभा गोपिका नारी । नारद तुंबरू हो । साम गायन करी ॥२॥
प्रगट गुह्य बोले । विश्व ब्रह्मची केलें । रामा जनार्दनीं । पायीं ठकची ठेलें ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to इतर आरती संग्रह