जयदेवी जयदेवी जय श्रीसत्याम्बे । अनाथनाथे अम्बे आई जगदम्बे ॥धृ॥
संकटी पडता कार्तिकस्वामी रणकाळी ॥ सत्याम्बा व्रत करण्या सांगे शशिमौळी ॥
व्रत करिता जय लाभे प्रसन्न हो काली ॥ अम्बे तव महिमा गाऊ त्रिकाळी ॥१॥
जयदेवी ॥ होता कांचिपुरी ब्राह्मण कौंडिण्य ॥ विटला बहु जीवाला न मिळे त्या अन्न ॥
व्रत करिता सत्याम्बा होई प्रसन्न ॥ देऊनि सुखसंपत्ती त्या केले धन्य ॥२॥
जय देवी ॥ सूर्यकेतू राजा सौराष्‍ट्राधिप थोर ॥ परचक्रा योगे त्या लागे घोर ॥
व्रत करिता सत्याम्बा करी चमत्कार ॥ पळमात्रे शत्रूचा होई संसार ॥३॥
जयदेवी ॥ गुण्ड नामे शूद्र होता मालवदेशी ॥ पूर्वपापायोगे सुत नव्हता त्यासी ॥
व्रतमहिमा ऐकोनि करिता व्रतासी ॥ झाला सुपुत्र तत्कुल उध्‍दरिता त्यासी ॥४॥
जयदेवी ॥ ऐसा तव व्रतमहिमा माते अपार ॥ व्रत करिता करिशी भक्‍ता भवपार ॥
तुझ्या भक्‍तीमध्ये न पडो अंतर ॥ अंबे तव कृपेचे हेचि एक सार ॥५॥जयदेवी॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel