कमलानन खगवाहन मणिभूण शौरी ।

रथ भंजन विमलार्जुनविटपांते मारी ॥

अरिमर्दन मधुसूदन भक्तजना तारी ।

यदुनंदन वज्रमंडन भयभय नीवारी ॥ १ ॥

जय देव जय देव जय यादवराया ।

न कळे महिमा शेषा मग झाला शय्या ॥ धृ. ॥

वज्रवनिता सुखभरिता ध्याती भगवंता ॥

मनमोहन जगजीवन कामाचा जनिता ।

सुरभीसमूहवेष्टित मुरलीस्वर गातां ।

विगलितवसना धावति गोपांच्या वनिता ॥ जय देव. ॥ २ ॥

करुणाकर गिरिवरधर वत्सासुरमदना ।

अघशोषण बकनाशक कलियविषहरणा ।

यमुनाजल करि निर्मळ गोगोवळ कान्हा ॥

धरुनी नाना लीला अघटित करि घटना ॥ जय देव. ॥ ३ ॥

विष भरुनि स्तनिं दोन्ही ते मातुलभगिनी ।

येउनि बोले कृष्णा पाहिन मी नयनी ॥

उचलुनी घेउनि कडिये लांविता स्तनी ।

शोषुनीं प्राण नेला निजपद सुखसदनी ॥ जय. ॥ ४ ॥

कमलासन करि शोधन धरुनि अभिमान ।

गाईगोवळवत्सें नेली चोरुन ।

पुनरपि तैसी देखुनि लज्जायमान ।

जनपंडित शरणागत बोले हरिगण ॥ जय. ॥ ५ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel