श्रावणकृष्णाष्टमिसी गोकुळिं अवतरले ।

तुमच्या दर्शनमात्रे बहु पापी तरले ।

बाळपणी स्तनपानें पुतना आसु हरिले ।

तुमची अनंतलीला वेदश्रुति बोले ॥ १ ॥

जय देवा जय देवा कृष्णा जगपाळा ।

दामोदर गोपाळा बाळा घन नीळा ॥ धृ. ॥

देवकिवसुदेवांच्या येउनि उदरासी ।

कंसादिक निर्दाळुनी भक्तां सुख देसी ॥

राहसी स्थिरचर व्यापुनि धर्मासी ।

तुझी अनंतशक्ती न कळे अमरांसी ॥ जय. ॥ २ ॥

केशव माधव विष्णू वामन श्रीरंगा ।

नारायण गोविंदा अच्युत अघभंगा ॥

मधुसुदन संकर्षण श्रीपांडुरंगा ।

श्रीधर विरंचि शंभू इच्छित तव संगा ॥ जय. ॥ ३ ॥

जगदात्मा गोवर्धनधारी जय कृष्णा ।

गोपीजन मुनीमानसहंसा कुळभूषणा ॥

कृष्णा वस्त्रहरणीं तारिसि सूरहरणा ।

करुणासिंधू सखया पुरवी मम तृष्णा ॥ जय. ॥ ४ ॥

शरणागत मी येतों तुझिया चरणांसी ।

आज्ञा दे सर्वज्ञा मज अज्ञानासी ॥

तारी सकळहि संकट वारुनि तम नाशीं ।

पुनरपि येणें चुकवी जननी जठरासी ॥ जय. ॥ ५ ॥

भव गज मज बहु जाची दुस्तरगति याची ।

म्हणउनि विष्णू इच्छा करि तव चरणाची ॥

मद‌भय हरि हरि होउनि श्रीहरि मुक्तींची ।

इच्छा पुरवी बापा जननी भक्तांची ॥ ६ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel