आरती भुवनसुंदराची ।

इंदिरावरा मुकुंदाची ॥ धृ. ॥

पद्मसमपादयुग्मरंगा ।

ओंवाळणी होती भृंगा ।

नखमणि स्त्रवताहें गंगा जे कां त्रिविधतापभंगा ॥ चाल ॥

वर्तुळ गुल्फ भ्राजमानें ।

किंकिणीक्वणित नाद घणघणित, वांकिवर झुणित, नुपुरें झनन मंजिराची ॥

झनन ध्वनि मंजिराची ॥ आरती. ॥ १ ॥

पीतपट हाटकतप्त वर्णी ।

कांची नितंब सुस्थानी ॥

नाभिची अगाध हो करणी ।

विश्वजनकाची जे जननी ॥ चाल ॥

त्रिवली ललित उदरशोभा ।

कंबुगळां माळ, विलंबित झळाळ कौस्तुभ सरळ, बाहु श्रीवत्सतरळमणिमरळ कंकणाची ॥

प्रीति बहु जडित कंकणाची ॥ आरती. ॥ २ ॥

इंदुसम आस्य कुंदरदना ।

अधरारुणार्क बिंबवदना ॥

पाहतां भ्रांति पडे मदना ।

सजल मेघाब्धि दैत्यदमना ॥ चाल ॥

झळकत मकरकुंडलाभा कुटिलकुंतली, मयूर पत्रावली वेष्टिले तिलक भाळी केशरी झळाळित कृष्णाकस्तुरींची ।

अक्षता काळि कस्तुरीची ॥ आरती. ॥ ३ ॥

कल्पद्रूमातळीं मूर्ती सौदामिनी कोटिदीप्ती ।

गोपीगोपवलय भवती ॥

त्रिविष्टप पुष्पवृष्टि करिती ॥ चाल ॥

मंजुळ मधुर मुरलीनादें ।

चकित गंधर्व चकित अप्सरा, सुरगिरिवरा, कर्पूराधर रतीनें प्रेमयुक्त साची ॥

आरती ओवाळित साची ॥ आरती. ॥ ४ ॥

वृंदावनीचिये हरणी ।

सखे गे कृष्ण माय बहिणी ॥

श्रमलों भवब्धिचें फिरणीं ।

आतां मज ठाव देई चरणीं ॥ चाल ॥

अहा हे पूर्ण पुण्यश्लोका ॥

नमितों चरण शरण, मी करुणा येऊं दे विषाणपाणी कृष्ण नेणतें, बाळ आपुलें राखि लाज याची ॥

दयानिधे राखि लाज याची ॥ आरती ॥ ५ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to श्रीकृष्ण आरती संग्रह