कंसराये गर्भ वधियेले सात ।

म्हणउनि गोकुळासी आले अनंत ॥

घ्यावया अवतार हेंचि निमित्त ।

असुर संहारोनी तारावे भक्त ॥ १ ।

जय देव जय देव जय विश्वरूपा ।

ओंवाळूं तूंते देहदीपें बापा ॥ धृ. ॥

स्थूल होउनि रुप धरिसी तूं सानें ।

जैसां भाव तैसा तयां कारणें ॥

दैत्यासी भाससी सिंहगर्जमानें ।

काळा महाकाळ यशोजे तान्हें ॥ २ ॥

अनंतवर्णी कोणा न कळेंची पार ।

सगुण कीं निर्गुण हाही निर्धार ॥

पांगली साही अठरा करितां वेव्हार ।

तो वळितसे गवळीयाचें खिल्लार ॥ जय. ॥ ३ ॥

तेतिस कोटी तीन्ही देवांसी श्रेष्ठ ।

पाउलें पाताळीं स्वर्गी मुगूट ॥

गिळिलीं चवदा भुवने तरिं न भरे पोट ।

खाउनि घालासे गोपालोच्छिष्ट ॥ ४ ॥

महिमा वर्णूं तरी पांगलीया श्रुती ।

शेषजिव्हा किरल्या करितां पै स्तुती ॥

भावेंवीण काही न चलेची युक्ती ॥

राखें शरण तुकया बंधू करि विनंती ॥ जय. ॥ ५ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel