कंसवधार्य धरातल धरिली भक्तांच्या ।

उद्धारार्थ जगद्‌गुरु होसी विश्वाचा ॥

श्रमले चारी शास्त्रें भ्रमल्या मनवाचा ।

तो तूं गोकुळनायक साक्षीं त्रिजगाचा ॥ १ ॥

जय देव जय देव जय आदीपुरुषा ।

अहिविषमदहरणा श्रीगोविंद परेशा ॥ धृ. ॥

विश्वविद्यासागर निशिदिनि तत्पर तूं ।

शशिकविकामित सहस्त्र युवतीजन पति तूं ॥

गोवर्धनधर कौतुक गुरुसुतदायक तूं ।

सुरनरकिन्नर मुनिजन शंकरह्रुदयी तूं । जय. ॥ २ ॥

निजशरणांगत रक्षक नंदघरी नटतां ।

गोपीजन मनमोहन करिसी वन अटतां ॥

उद्धव पार्था ज्ञानें तारिसि भव असतां ।

तरला गणकात्मज कविलक्ष्मींधर जपतां ॥ ३ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel