येउन मानवदेहा भुललों संसारी ।

धन सुत जाया माझी म्हणुनीयां सारी ॥

नाही स्मरलो तुजला क्षणही कंसारी ।

वारी भवदु:खातें शरणागत तारीं ॥ १ ॥

जय देव जय देव जय राधारमणा ।

चुकवी लक्ष योनी चौर्‌यांशी भ्रमणा ॥ धृ. ॥

जाणत आणत आपुले केले अनहीत ।

स्वेच्छें रतलों विषयी त्यजुनीयां विहित ॥

गेला जन्म सज्जनसंगाविरहित ।

त्वपदकमलीं भिनले नाही हे चित्त ॥ जय. ॥ २ ॥

केले अगणित पातक आतां तुज पाही ।

आलो शरणागत मी रक्षी लवलाही ॥

करुणांदृष्टीपूर्ण दोनांतें पाही ।

विनवी कृष्णदास मनिं येऊन राही ॥ जय. ॥ ३ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel