त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे गळां ।
आरती ओवाळूं पाहूं ब्रह्मपुतळा ॥ १ ॥
श्रीराम जय राम जय जय राम ।
आरती ओवाळूं पाहूं सुंदर मेघश्यामा ॥ धृ. ॥
ठकाराचे ठाण करी धनुष्यबाण ।
मारुती सन्मुख उभा कर जोडून ॥ श्रीराम. ॥ २ ॥
भरत शत्रुघ्न दोघे चौऱया ढाळित ।
स्वर्गीहूनी देव पुष्पवृष्टि करिती ॥श्रीराम. ॥ ३ ॥
रत्नखचित माणिक वर्णू काय मुगुटी ।
आरती ओवाळूं चवदाभुवनांचे पोटी ॥ श्रीराम. ॥ ४ ॥
विष्णुदास नामा म्हणे मागतो तूं ते ॥
आरती ओंवाळूं पाहू सीतापतीतें ॥
श्रीराम जय राम जय जय राम ॥ ५ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel