श्रीमद्रामचंद्रा अयोध्यापुरवासी ।
जन्म दशरथकूळी चैत्र नवमीसी ॥
उत्साह सुखकर झाला मनासी ।
थोर आनंद सकळा जनांसी ॥ १ ॥
जय देव जय देव रामचंद्रा, श्रीरामचंद्रा ।
कृपानिधान विभो करुणासमुद्रा ॥ धृ. ॥
रामलक्ष्मण असतां वनवासी ।
रावण भिक्षे आला होउनि संन्यासी ।
राम मृगा वधूं गेला वनवासी ॥
मागें हरिलीं सीता दुष्टें त्वरेसी ॥ जय. ॥
रामें त्वरित मिळवुनि वानरसेनेसी ।
सागरिं सेतू रचविंला आपुल्या नामेसी ॥
तयांवरुनि सत्वर गेलां लंकेसी ।
राक्षससैन्य वधोनी आणिलि सीतेसी ॥ जय. ॥ ३ ॥
अधिकारी केला बिभिषण लंकेसी ।
सीता घेउनि आला आयोध्यापूरासी ।
थोर आनंद सकळा जनासि ।
कृष्ण गोपाळ लागे चरणांसी ॥ जय. ॥ ४ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel