स्वात्मसुखामृत सागर जय सद‌गुरुराया ।
वेदांतार्णव मथितां तिलगुह्यापरमा ॥
निज निंर्गुण जगलीला जगदाकृति हेमा ।
जगदिश्वर तद्रूपा वरमंगल धामा ॥ १ ॥
जय देव जय देव जय सद्‌गुरुराया ।
ब्रह्म सुधाऽमर चिद्‌घन जय सार्वभौमा ॥ धृ. ॥
चिन्मय वस्तु तुं अगुणी सगुणाकृति धरिसी अगणित गुणगंभीर गुरु ईश्वरही होसी ।
अज्ञानांध सुशिष्या स्वप्रकाश करिसी ॥
शरणागत भवपाशापासुनि सोडविसी ॥ जय. ॥ २ ॥
स्वस्वरु पोन्मुखबुद्धी वैदेहि नेली ।
देहात्मका भिमाने दशग्रीवें हरिली ॥
सद्विवेक मारुतिनें सत्शुद्धी आणिली ।
तव चरणांबुजि येउनि वार्ता श्रुत केली ॥ जय. ॥ ३ ॥
देहादिक अहंकार रावणवध करिसी ।
केवल स्वमुखानंदी वससी अयोध्येसी ॥
सर्वांतरि व्यापुनियां सबाह्य तूं अससी ।
गुरुभक्तीहिन पुरुषा कोठे आढळसी ॥ जय. ॥ ४ ॥
देहत्रय व्यतिरिक्ता साक्षी समसंता ।
परमा नंदाऽनंता अद्वयरस भरिता ॥
करुणाऽगर भयनाशन श्रीदैशिक नाथा ।
स्वानंद्रे पद मौनी वंदित रघुनाथा ॥ जय. ॥ ५ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel