परमात्मा श्रीरामा महामाया जानकी ।
विश्रांती पावली गजर न कीजे सेवकीं ॥ १ ॥
आरती आरत ऎक्यभावें ओवाळूं ॥
प्रकाश स्वयंज्योती । निजतेने बंबाळूं ॥ धृ. ॥
स्नेह ना भाजन नाहीं वाती पावक ।
सबाह्य अभ्यंतरी अवघा निघोर दीपक ॥ आरती. ॥ २ ॥
ऎक्यांचें सुमनशेजे आत्मा रघुपती ।
वाचा पुरुषलिं शब्द न बोलवें पुढती ॥ आरति ॥ ३ ॥
राम आणि दास चैतन्य पहुडले रानी ।
हेंही बोलावयासी दुजा न ऊरे धामी ॥आरती. ॥ ४ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel