जय जय जगतमहरणा दिनकर सुखकिरणा ।
उदयाचाल जगभासव दिनमणि शुभस्मरणा ॥
पद्मासन सुखमूर्ती सुहाय्य वर वदना ।
पद्मकरा वदप्रभ भास्वत सुखसदना ॥ १ ॥
जय देव जय देव जय भास्कर सूर्या ।
विधिहरिशंकररूपा जय सुरवरर्या ॥ धृ. ॥
कनकाकृतिरथ एकचक्रांकित तरणीं ।
सप्ताननाश्व भूषित रथिं त्या बैसोनी योजनसहस्त्र द्वे द्वे शतयोजन दोनी ॥
निमिषार्धे जग क्रमिसी अदभूत तव करण ॥ जय. ॥ २ ॥
जगदुद्भवस्थितिप्रलय करणाद्य रुपा ।
ब्रह्मापरात्पर पूर्ण तूं अद्वय तद्रूपा ॥
तत्वंपदव्यति रिक्ता अखंडमुखरुपा ॥
अनन्य तव पद मौनी वंदित चिद्रूपा ॥ ३ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.