सप्तमुखी अतिचपळ रथिं तुझ्या वाजी ।

पदद्वयविरहित अरुण सारथ्यकाजीं ।

ऎसा तूं दिनकर बैससि त्यामाजीं ।

चिंतन करितां तुझें पावसि तूं सहजीं ॥ १ ॥

जय देव जय देव जय भास्करा ।

पंचारती ओंवाळूं तुज सहस्त्रकरा ॥ धृ ॥

तमनाशक प्रकाशक छायेचा रमण ।

प्रात:काळीं द्विजवर करिती अर्चन ॥

त्यांतें तूं दिनकर करिस पावन ।

महिमा न कळे तुझा तोंडी अज्ञान ॥ जय. ॥ २ ॥

तुज वाचुनियां लोकी सर्वहि शुन्यता ।

सकळां सौख्य होते तव उगम होतां ॥

ब्रह्मा हरिहर हेची तुझी स्वरुपता ।

शरणागता वसुदेव रक्षीं तूं सविता ॥

जय देव. ॥ ३ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel