निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा ॥
भक्त तारावया कृपा सागरा ॥
अभय वरद हस्त तूं फरशूधरा ॥
भवसिंधू तारक तूं करुणा करा ॥
जयदेव जयदेव गणपति वेल्हाळा ॥
आरति (भावार्थि) ओवाळूं तव चरण कमळा ॥जयदेव १॥धृ०॥
सिंव्हासन दुसरीं मिरवति ठसे ॥
तेज महा कोटी भानु प्रकाशे ॥
तयावरी सकुमार गणराज (महाराज) बैसे ॥
ब्रह्मादिक स्तविताती मुनीजन संतोषे ॥जयदेव० ॥२॥
कनक मंडपावरि कलश शोभति ॥
हिर जडित रत्‍नक्रिडा फाकती ॥
ध्वजा पताका वरि मिरवती ॥
अकळे नकळसी कवणा हा मंगलमूर्ति ॥जयदेव० ॥३॥
षोडशविधि पूजा झालि गणपाळा ॥
नर सुरगण गंधर्व आनंद सकळा ॥
सिद्धि बुद्धि सहित होतसे सोहळा ॥
लिंब लोण करी उमावेल्हाळा ॥जयदेव० ॥४॥
अष्टभावें आरति आनंद मूर्तिं ॥
निज बोधें ओवाळू कल्याण कीर्तिं ॥
मोरयागोसावी करितो विनंति ॥
शरणांगतां तारिं तूं मंगलमूर्तिं ॥जयदेव० ॥५॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel