शेषाचल अवतार तारक तूं देवा ।

सुरवरमुनिवर भावें करिती जन सेवा ॥

कमळारमणा अससी अगणित गुण ठेवा ।

कमळाक्षा मज रक्षुनि सत्वर वर द्यावा ॥ १ ॥

जय देव जय देव जय व्यंकटेशा ।

केवळ करुणासिंधू पुरवीसी आशा ॥ धृ. ॥

हे निजवैकुंठ म्हणुनि घ्यातों मीं तूंतें ।

दाखविसी गुण कैसे सकळिक लोकांते ॥

देखुनि तुझें स्वरुप सुख अद्‌भुत होतें ।

ध्यातों तुजला श्रीपति दृढ मानस होतें ॥ जय. ॥ २ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel