ते शाळेत असतांनाची एक घटना प्रसिद्ध आहे. एकदा वर्गात शिक्षक नसतांना काही मुलांनी शेंगा खाऊन त्यांची टरफले वर्गातच टाकली होती. अपेक्षेप्रमाणे हा कचरा पाहून शिक्षक रागावले आणि कचरा करणार्यांची नावे विचारली. पण जेव्हा कुणीच स्वतःहून पुढे आले नाही, तेव्हा त्यांनी सर्व मुलांना टरफले उचलायला सांगितले. पण टिळकांनी टरफले उचलायला नकार दिला. ते म्हणाले, "मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही" तसेच शिक्षकांनी त्यांना कचरा करणार्या मुलाचे नाव विचारले असता त्यांनी नाव सांगण्यास नकार दिला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.