शके सतराशें एकाहत्तर । सौम्यनाम संवत्सर ॥
भाद्रपद वद्य सप्तमी प्रहर । द्वितीय, वार आदित्य हा ॥८२॥
तये दिनीं समाप्त । ग्रंथ आनंदचरितामृत ॥
लेखनकृत्य समाप्त । ब्रम्हावृंदें ब्रम्हानाळीं ॥८३॥
सर्वीं लिहोनिया ग्रंथ । नेवोनि ठेविला मठांत ॥
तें पाहोनी श्रीगुरुनाथ । संतुष्टले सर्वांतें ॥८४॥
संतुष्ट होती श्रीगुरूमूर्ती । सर्वां आनंद न माय चित्तीं ॥
धन्य धन्य ते मानिती । आपणांतें सर्वही ॥८५॥
प्रसन्न झालिया देवो । काय न पाविजे जीवो ॥
पुरुषार्थ चतुर्विध सर्व । घालोनि वरील तयातें ॥८६॥
इतिश्री आनंदचरितामृत ग्रंथ । जे रक्षति अति स्वार्थ ॥
धर्मार्थ काम मोक्ष तेथें । सर्वकाळ नांदती ॥८७॥
आनंदचरितामृत ग्रंथ । बापानंदविरचित ॥
प्रेमळ संत परिसोत । षोडशाध्याय समाप्त हा ॥८८॥


॥ श्री रघुनार्थापर्णमस्तु. ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel