अlशिष (बाबा आमटेंचा नातू)

जपानच्या एका ट्रेन मध्ये चढला.

ट्रेन तशी मोकळी होती. तो ज्या डब्या मध्ये होता त्यात जेमतेम २-३ माणसे होती. सीट मोकळे असल्यामुळे तो सरळ जाऊन समोरच्या एका सीट वर बसला. थोडा वेळ झाला तसा एक मध्यम वर्ग जपानी व्यक्ति त्याच्या शेजारीच पण एक सिट सोडुन बसला. दोन-तीन मिनिटाने सहज त्याचे लक्ष त्या व्यक्तिकडे गेले तर तो त्याच्या सीटमधे काहीतरी छोटी वस्तु घुसवत होता. अशिषला जरा विचित्र वाटले म्हणुन त्याने त्याची नजर वळवुन दुसरीकडे

पाहायला लागला. बराच वेळ झाला तरी ती त्या व्यक्तिचं ते काम चालुच होतं. न राहुन अशिष ने निरखुन पाहिलं तर त्याच्या हातात एक सुई

दोरा होता आणि तो त्याच्या खाली फ़ाटलेली सीट शिवत होता. अlशिषला थोडं आश्चर्य वाटलं. जेंव्हा त्याची सीट शिवुन झाली तेंव्हा अशिषने न राहुन त्या व्यक्तिला जपानी भाषेत विचारलं. (भाषांतरीत)

अlशिष : माफ़ करा पण मला प्रश्न पडला होता ?

व्यक्ति : हो विचारा कि.

अशिष : तुम्ही ट्रेनचे कर्मचारी आहात का? तुम्ही सीट शिवताय म्हणुन म्हटलं.

व्यक्ति : नाही. मी कुणी कर्मचारी नाही. साधा शिक्षक आहे. लहान मुलांच्या शाळेतील. दररोज ह्याच ट्रेनने प्रवास करतो. दररोज ही सीट फ़ाटलेली पाहत असतो. आज आठवणीने सुई-दोरा आणुन शिवुन टाकली. कशी जमलीये छान ना ? (हसत हसत )

अlशिष : हो. पण तुम्ही का शिवताय ?

व्यक्ति : कारण ही फ़ाटलेली सीट खुप विचित्र दिसत होती. जर उद्या कुणी बाहेरुन आलेल्या व्यक्तिने हे पाहिलं असतं तर आमच्या देशाचं नाव त्याच्या साठी खराब झालं असतं.

माझ्या देशाचं नाव कुठे मलीन झालेलं मला आवडणार नाही शेवटी ही आमचीच संपत्ती आहे आणि आम्हालाच सांभाळायची आहे.

"आमच्या देशाची काळजी आम्ही नाही घेणार तर कोण घेणार?"

ट्रेन थांबली आणि "अच्छा! जातो." म्हणुन ती व्यक्ति गेली देखील.

अlशिष त्या वेळी फ़क्त ’निःशब्द’ होता. स्वत:च्या देशावर

भरभरुन प्रेम करणाऱ्या त्या साध्या जपानी माणसाला मनातुन एक कडक सलाम ठोकला. माणुसकीचे, राष्ट्रप्रेमाचे, संस्कृतीचे धडे जगाला देणाऱ्या त्या जपानचं मुळ कशात आहे ह्याचं उत्तर अशिषला मिळालं होतं.

"संस्कार आणि संस्कृती".

फुटबॉल च्या सामन्यात पराभव झाल्यानंतर, सामना बघायला आलेल्या जपानी प्रेक्षकांनी सामना संपल्यावर थांबून त्यांच्या भागातील कचरा प्लास्टिक च्या पिशव्यांत भरून साफसफाई केली. या पिशव्या बरोबर नेऊन शहरातील कचरा टाकण्यासाठी केलेल्या जागांवर नेऊन टाकल्या.

देश मोठे होतात ते अशा नागरिकांमुळे.


आणि आम्ही देशात थोडे कुठे काय झाले की लागतो लगेच एस्. टी, रेल्वे व इतर सरकारी गाड्या, अॉफिस वगैरे तोडायला आणि जाळायला.!! कसा होणार देश महान, महासत्ता ??

ट्रक च्या मागे 'मेरा देश महान' असे लिहून नाही... विचार बदला देश बदलेल.!!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel