मोहिनी-मोहन: भोगदायिनी-कान्ति-मण्डित: ।
कामिनीकान्त-वक्त्रश्री: अधिष्ठितवसुन्धर: ॥५६॥
३००) मोहिनीमोहन---मोहिनीनामक शक्तीलाही मोहित करणारा.
३०१) भोगदायिनीकान्तिमण्डित---भोगदायिनीनामक शक्तीच्या तेजाने मण्डित. (ज्याची चरणकमले सुशोभित दिसतात.)
३०२) कामिनीकान्तवक्त्रश्री---कामिनी नामक शक्तीच्या सुंदर मुखाची शोभा वाढविणारा. वक्त्र म्हणजे मुख. श्री: - शोभा, सौंदर्य किंवा कामिनी नामक शक्तीच्या मुखावरील शोभास्वरूप असणारा.
३०३) अधिष्ठितवसुन्धर---वसुन्धरेचे म्हणजे पृथ्वीचे अधिष्ठान असणारा.
वसुन्धरा-मदोन्नद्ध-महाशङ्ख-निधिप्रभु: ।
नमत्-वसुमती-मौलिमहापद्म-निधिप्रभु: ॥५७॥
३०४) वसुन्धरामदोन्नद्धमहाशङ्खनिधिप्रभु---वसुन्धरा नामक पत्नीसह आनंदित राहणार्या महाशंख नामक निधीचा स्वामी. किंवा वसुन्धरेच्या गर्वास मर्यादा घालणार्या महाशंख निधीचा पालक.
३०५) नमद्वसुमतीमौलिमहापद्मनिधिप्रभु---महाशङ्ख आणि महापद्म ही दोन निधिदैवते. अनुक्रमे वसुधारा व वसुमती या त्यांच्या पत्नी, ज्याच्या चरणांवर आपले मस्तक झुकवितात अशा महापद्मनिधीचा स्वामी.
सर्वसद्गुरु-संसेव्य: शोचिष्केश-हृदाश्रय: ।
ईशानमूर्धा देवेन्द्रशिख: पवननन्दन: ॥५८॥
३०६) सर्वसद्गुरूसंसेव्य---सर्व सद्गुरूंकडून ज्याची सेवा, आराधना केली जाते असा.
३०७) शोचिष्केशहृदाश्रय---शोचिष्केश म्हणजे दक्षिण, गार्हपत्य, आहवनीय, सभ्य व आवसथ्य अग्नि ह्या पंचाग्नींच्या हृदयात राहणारा.
३०८) ईशानमूर्धा---ईशान म्हणजे शंकर. शंकर ज्याच्या मस्तकावर आहे असा किंवा भगवान् शंकरालाही जो शिरोधार्य आहे असा. भगवान् शंकरालाही वंदनीय असणारा.
३०९) देवेन्द्रशिख---देनेन्द्र म्हणजे देवांचा राजा इन्द्र. इन्द्र ही ज्याची शिखा म्हणजे शेंडी आहे असा.
३१०) पवननंदन---वायूला आनंदित करणारा किंवा ज्याच्या अधिष्ठानावर प्राण आनंद उपभोगतात असा तो.
अग्रप्रत्यग्रनयन: दिव्य-अस्त्राणां प्रयोगवित् ।
ऐरावत-आदि-सर्वाशा-वारण-आवरणप्रिय: ॥५९॥
३११) अग्रप्रत्यग्रनयन---सूक्ष्म व नूतन दृष्टीने युक्त. प्रसन्न, टवटवीत डोळ्यांचा किंवा दोन्ही बाजूस ज्याचे नेत्र दीर्घ आहेत असा.
३१२) दिव्यास्त्राणांप्रयोगवित्---दिव्य अस्त्रांचे प्रयोग जाणणारा.
३१३) ऐरावतादिसर्वाशावारणावरणावरणप्रिय---खेळ खेळताना ऐरावतादि सर्व दिग्गजांना (आठ दिशांना, ज्यांच्या आधारावर हे सर्व ब्रह्माण्ड स्थिर राहिले आहे असे ऐरावत, पुंडरीक, वामन, कुमुद, अंजन, पुष्पदंत, सार्वभौम आणि सुप्रतीक हे अष्ट दिग्गज आहेत.) झाकून टाकणे ज्याला प्रिय आहे असा.
वज्रादि-अस्त्रपरिवार: गण-चण्ड-समाश्रय: ।
जया-अजया-परिवार: विजया-विजयावह: ॥६०॥
३१४) वज्राद्यस्त्रपरिवार---वज्रादी अस्त्रे हाच ज्याचा परिवार आहे असा किंवा वज्रादी अस्त्र ज्यांच्या हातात आहेत अशा दिक्पालांनी परिवेष्टिट असा. किंवा ज्याचा वज्र इत्यादी अस्त्रांचा परिवार आहे असा.
३१५) गणचण्डसमाश्रय---गणात जे प्रचण्ड आहेत त्यांना आश्रय देणारा.
३१६) जयाजयापरिवार---जया-अजयादी ह्या ज्याचा परिवार आहेत असा. (जया-विजया-अजया-अपराजिता-तित्या-विलासिनी-"शौण्डी-अनन्ता आणि मङ्गला या नऊ प्राणशक्ती आहेत.)
३१७) विजयाविजयावह---विजया नामक शक्तीस विजय प्रदान करणारा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.