अर्चना संतोष लालसरे(गिरीजा)
आषाढ सरता आला श्रावण, धरती ला बांधून, हिरवे तोरण,
आला श्रावण, हिरवाईची शाल पांघरून आला श्रावण!!
काळ्या ढगांना आस लागली, चातका समान वाट पाहिली,
कधी बरसशील आपल्या ताला, आला आला श्रावण!!
निळ्या नभातून बरसेल श्रावण,
धरतीची तहान शमवेल श्रावण ,
चाफा फुलेल, प्राजक्त दरवळेल ,
आला आला श्रावण!!
श्रावण येता निसर्ग फुलतो,
फुलवून पिसारा मोर नाचतो,
झाडी वेली येती बहरून,
आला आला श्रावण!!
घन निळ्या या आकाशात आले मेघ दाटून! हर्ष होई अंकुरास,
बीज फुटतील दवातून,
आला आला श्रावण!!
पावसाची पडता सर, पशुपक्ष्याना वाटे हुरहूर! काय होई घरट्याचे! चिंतीत झाले त्यांचे मन!!
कोकिळा बांधे घरटे परत!
कोकीळ सुखावला गाणे गाऊन,आला आला श्रावण!!
श्रा्वणातल्या बरसातीने चोहीकडे पसरला मोद,
मुले खेळती झोपडीसमोर ,
हिरवे गार झाले अंगण,
आला आला श्रावण!!
प्राजक्ताचा सुवास ऐसा!,
मोहून जाई तन आणि मन,
इंद्र धनूची बांधुन कमान,
हाती घेऊन हिरवे तोरण'
आला आला श्रावण..!!