पूजा सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची मूर्ती एखाद्या लाकडाच्या पाटावर किंवा गहू, मूग, ज्वारीच्या धान्यावर लाल कपडा अंथरून स्थापित करा.
पूजन प्रारंभ
पूजा करणार्या व्यक्तीने प्रत्येक क्रियेबरोबर मराठीत दिलेली माहिती वाचून त्याचे अनुकरण करावे. प्रत्येक क्रियेच्या माहितीसह विधी दिलेला आहे. संपूर्ण विधी दोन-तीन वेळा वाचून त्याप्रमाणे कृती करावी.
दीप पूजन:
तूपाने भरलेल्या पात्रात दिवा प्रज्वलित करा. दिवा लावून हात धुवा. खाली अक्षता टाकून त्यावर दिवा ठेवा. हातात फुलांच्या पाकळ्या घेवून खालील मंत्र म्हणा.
'हे दीप देवा ! मला नेहमी सुखी ठेव. जोपर्यंत हे पूजन चालू आहे तोपर्यंत आपण शांत किंवा स्थिर प्रज्वलित रहा.' यानंतर पाकळ्या दिव्याच्या खालील बाजूस टाका.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.