बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक-राजकीय सुधारक म्हणूनच्या वारस्याचा आधुनिक भारतावर पडलेला प्रभाव अतिशय प्रभावशाली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील त्यांच्या सामाजिक-राजकीय विचारांचा राजकारणामध्ये आदर आहे. त्यांच्या पुढाकारामुळे जीवनाच्या विविध क्षेत्रात परिणाम झाला आहे आणि आज भारताची सामाजिक-आर्थिक आणि कायदेशीर प्रोत्साहनांद्वारे सामाजिक-आर्थिक धोरणे, शिक्षण आणि सकारात्मक कृती पाहता भारताचा दृष्टीकोन बदलला आहे. एक विद्वान म्हणून त्यांची प्रतिष्ठा असल्याने स्वातंत्र्य भारताचे प्रथम कायदा मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि संविधानाचा मसूदा तयार करण्यासाठी ते मसूदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी वैयक्तिक स्वातंत्र्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला आणि जातीरहित समाजावर टीका केली. हिंदू धर्म हा जातिव्यवस्थेचा पाया असल्याच्या त्यांच्या विधानांनी त्यांना सनातनी हिंदुंमध्ये विवादास्पद व अलोकप्रिय बनविले. बौद्ध धर्मातील त्यांच्या धर्मांतराने भारतात व परदेशात बौद्ध तत्त्वज्ञानाच्या रूचीमध्ये एक पुनरुज्जीवन घडून आले.

अनेक सार्वजनिक संस्था, विद्यापीठे, विमानतळे, महाविद्यालये, मैदाने, नगर, संघटना, पक्ष, स्टेडियम, दवाखाने, कारखाने, महामार्ग, रस्ते, इत्यादी त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाने नामांकित आहेत, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर, आंबेडकर विद्यापीठ दिल्ली त्यांच्या सन्मानार्थ नामांकित केल्या गेलेल्या आहेत. भारतीय संसद भवनात आंबेडकरांचे मोठे अधिकृत तैलचित्र प्रदर्शित केले आहे.

१९२० च्या दशकात बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी म्हणून लंडनमध्ये ज्या घरात राहिले होते, ती वास्तू महाराष्ट्र सरकारने विकत घेऊन त्याला संग्रहालयाचे रूप देत त्यांचे रूपांतर आंतरराष्ट्रीय आंबेडकर स्मारक म्हणून केले गेले आहे.

आंबेडकरांना २०१२ मध्ये हिस्ट्री टीव्ही 18 आणि सीएनएन आयबीएन यांनी आयोजित केलेल्या सर्वेक्षणात "द ग्रेटेस्ट इंडियन" म्हणून सर्वाधिक मतदान दिले गेले होते. जवळजवळ २ कोटी मते टाकली गेली होती आणि याच्या शुभारंभानंतर त्यांना 'सर्वात महान भारतीय' किंवा 'सर्वात लोकप्रिय भारतीय' व्यक्ती घोषित केले गेले.

आंबेडकरांच्या राजकीय तत्त्वज्ञानाने मोठ्या संख्येने राजकीय पक्ष, प्रकाशने आणि कामगार संघटनांना जन्म दिला आहे, ज्या संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात सक्रिय आहेत. बौद्ध धर्माबद्दलच्या त्यांच्या प्रबंधामुळे भारताच्या लोकसंख्येतील मोठ्या वर्गांमध्ये बौद्ध तत्त्वज्ञानामधील रूची वाढली आहे. १९५६ मधील आंबेडकरांच्या नागपूर येथील धर्मांतर सोहळ्याचे अनुकरण करत, वर्तमान काळातील मानवाधिकार कार्यकर्त्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्मांतर सोहळे आयोजित केले जातात. भारतीय बौद्ध अनुयायी त्यांना बोधिसत्व व मैत्रेय असे संबोधतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel