जवाहरलाल आणि कमला या नेहरु दाम्पत्याचे इंदिरा गांधी हे एकमेव अपत्य होते. १९ नोव्हेंबर १९१७ ला इंदिराचा जन्म झाला. मुळात नेहरु हे काश्मिरीपंडित होते. इंदिरांचे आजोबा मोतीलाल नेहरु व्यवसायाने वकील आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आघाडीचे नेते होते. भारताच्या राजकारणात त्यांना मानाचे स्थान होते. ते स्वरूप राणी यांसोबत विवाह करून अलाहाबाद येथे स्थायिक झाले. जवाहरलाल नेहरोइओ यांचे शिक्षण इंग्लंड मध्ये झाले, पुढे ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले अतिशय लोकप्रिय, महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले. तसेच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधानही बनले. इंदिरा गांधींचे बालपण आपल्या घराच्या स्वातंत्र्य लढ्याच्या संस्कारांतच झाले. पुढे त्यांनी लहान मुलामुलींची वानरसेना चळवळ सुरू केली. निदर्शने, मोर्चे काढणे, बंदी घातलेल्या गोष्टींची वाहतूक करणे वगैरे गोष्टी ही सेना करीत असे.


इंदिरा गांधी ६ वर्षांच्या असतांना त्यांनी दिल्ली येथे केलेले उपोषण

१९३६ मध्ये इंदिरा गांधी यांच्या आई कमला नेहरू यांचे दीर्घ आजाराने देहावसान झाले. यावेळी इंदिरा गांधींचे वय केवळ १८ होते. त्यांचे शिक्षण सोमरविले कॉलेज, ऑक्सफर्ड विद्यापीठ येथे झाले. याच दरम्यान त्या लंडनमधील इंडिया लीगच्या सदस्या झाल्या. १९४० च्या दशकात इंदिरा गांधींनी फुप्फुसाच्या आजारातून बरे होण्यासाठी काही काळ स्वित्झर्लंड मध्ये व्यतीत केला. याच दरम्यान जवाहरलाल यांनी इंदिरा गांधींना लिहलेली पत्रे प्रसिद्ध आहेत. युरोपातल्या वास्तव्यादरम्यानच त्यांची ओळख फिरोज गांधी या तरुणाशी झाली. ही ओळख नंतर प्रेमात बदलून अखेर त्या दोघांनी विवाह केला.संसार छान केला

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel