इंदिरा गांधी व फिरोज गांधी
इंदिरा गांधींनी इतक्यातच लग्न करू नये म्हणत जवाहरलाल नेहरु यांनी त्यास विरोध केला. पण इंदिरा ठाम होत्या व त्यांनी मार्च १९४२ मध्ये विवाह केला. फिरोज गांधींसुद्धा राजकारणात सक्रिय होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे फिरोज व इंदिरा दोघे सदस्य होते. १९४२ च्या लढ्यात भाग घेतला म्हणून दोघांना अटक झाली होती. फिरोज गांधीं हे स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशातून संसदेवर निवडून गेले होते. या दांपत्याला राजीव व संजय अशी दोन मुले झाली. पण त्यानंतर दोघात दुरावा येत गेला. दरम्यानच्या काळात फिरोज गांधींना हृदय विकाराचा झटका आला. अखेर १९६० मध्ये फिरोज गांधींचा मृत्यू झाला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.