यांचा जन्म भारतातील कर्नाटक राज्यातील चिकबळ्ळापूर तालुक्यातील कोलार जिल्हयातील मुद्देनहळ्ळी या गावी झाला.ते श्रीनिवास शास्त्री व वेंकटलक्षम्मा यांचे अपत्य होते.त्यांचे जन्मगाव पुर्वी म्हैसूर राज्यात होते.त्यांचे वडिल हे एक संस्कृत विद्वान होते व हिंदू ग्रंथांचे भाष्यकार असून आयुर्वेदिक वैद्य होते.त्यांचे पुर्वज हे मोक्षगुंडम या गिद्दलपूर नजिकच्या, सध्याच्या आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात असलेल्या गावातील होते. त्यांनी म्हैसूर राज्यात सुमारे तीन शतकापुर्वीच स्थलांतर केले.'मोक्षगुंडम ' हे नाव त्यांची आंध्र प्रदेशशी असलेली संलग्नता दाखवते. तरुण विश्वेश्वरैय्या यांच्या वडिलांचे ते १५ वर्षाचे असतांना निधन झाले.त्याने त्यांचे कुटुंब हादरले.त्यानंतर ते परतकुर्नुल येथुन मुद्देनहळ्ळी ला आले.त्यांचे प्राथमिक शिक्षण चिकबळ्ळापूर येथे तर उच्चमाध्यमिक शिक्षण बंगलोर येथे झाले. ते १८८१ साली मद्रास येथुन बी.ए.ची परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. स्थापत्य अभियांत्रीकीचे पुढील शिक्षण त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनीयरींग,पुणे मध्ये पुणे येथे घेतले. १८८३ मध्ये ते इंजिनिअरिंगच्या पदवी परीक्षा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले.