सरिता (नाव बदलले आहे) ने शिक्षण पूर्ण करताच नोकरीचा शोध सुरु केला. चांगली नोकरी तिला शोधून शोधून सापडली नाही. शेवटी नाईलाजाने तिने एका मॉल मध्ये फ्रंट डेस्क स्टाफ म्हणून नोकरी पत्करली. अभिनव हा विवाहित पुरुष तिचा बॉस होता. अभिनव तिला आपल्याला कॉफी आण, आपल्यासाठी एकदा शर्ट निवड इत्यादी कामे सांगायचा. सरिताला हे आवडत नसले तरी तिचा नाईलाज होता. नोकरी साठी ती हे सर्व काही करायची.
एक दिवस अभिनव ने तिला आपल्या सोबत चित्रपट पाहायला येतेस का असे विचारले. सरिता इथे सावध झाली आणि तिने नकार दिला. चित्रपट नको असेल तर तुला घरी तरी सोडतो असे अभिनवने तिला सांगितले. सरिता ने नाईलाजाने ते मान्य केले. पार्किंग लॉट मध्ये क्लॉक होता तेंव्हा अभिनव ने सरिताला पकडून किस करण्याचा प्रयत्न केला. सरिताने घाबरून तिथून पळ काढला आणि ती पुन्हा कामावर गेली नाही.
इथे विशेष काही नाही घडले असे वाटले तरी सरिताबरोबर जे काही झाले ए तिचे शोषण होते. अनेकदा लैगिक चाळे नसले तरीसुद्धा शोषणाची भीती बाली पडलेल्या व्यक्तीवर असते. अश्यावेळी हे शोषण आधीच खोडून काढले पाहिजे.