मयूर बाळकृष्ण बागुल, पुणे
९०९६२१०६६९

जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले हा अभंग खूप काही सांगून जातो. दर वर्षी दिपावलीचा सण येतो . खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते .बघावे तिकडे फक्त नजर फिरवावी आणि पाहून थक्क व्हावे अशा प्रमाणात लोक एकदम गर्दी करतात. वर्षातून एकदा येणा रा सण. मुला बाळांना व घरातील मंडळीना नवीन कपडे खरेदी करतात. घरातील स्री सर्वासाठी गोड पक्वान्न, फराळ करते आणि कसे पटकन दिवस निघून जातात बाळ गोपाळांमध्ये.. कळत नाही.

हे सर्व जरी आ नंदात साजरे करत असतांना , भारत देश स्वतंत्र होऊन ६० वर्ष होऊन गेले तरी येथील  वंचितांचे प्रश्न मात्र सुटत नाही. कायदे असून न्याय नाही,योजना असून उपयोग नाही, ही परिस्थिती. आज शिक्षणामुळे देश प्रगती करत आहे पण पालावर, रस्त्यावर, खा णीत काम करणार्‍यांची दिवाळी काय कुठला आंनद,कुठला फराळ, कुठले कपडे कधी दिसत असेल का ? हा प्रश्न मना मध्ये येतो खर तर मोठ्या प्रमाणात फटाके खरेदी करुन उडवले जातील पण चिमुकल्यांच्या तोंडात गोड खाऊ मात्र देऊ शकणार का ? रस्त्यावर गाडी ची काच अलगद वाजवणारे चिमुकले हात बघतांना नजर देखील फिरत नसेल का ? आम्ही फक्त म्हणायचे “आम्ही सारे भारतीय” भारत माझा देश आहे सारे भारतीय कधी कधी माझे भाऊ व बहीण आहेत. प्रश्न प्रत्येकाला कळतो पण करणार काय ?शेवटी स्वतःचे ते गोड दुसर्‍याचे ते कडू हा स्वभाव बनलेला असतो. आपण सुट्टी मध्ये फिरायला जातो तसे आपल्या परिवारासोबत जर या कुंटूबाला फिरायला घेऊन जायचे म्हटल तर शक्य नाही का होणार? पण विचार करतो खर्च करण्याचा पण एका वर्षात किती फालतू खर्च करतो हा विचार कधी केला आहे का ? नसेल केला तर नक्की विचार करा.

दिव्याचा प्रकाश हा स्वतःच्या  घरात जसा उजळून दिसतो तसा दुसर्‍याचा दारात कसा उजळून दिसेल हा थोडा विचार मनात ठेवा. हे अठरा वर्ष दारिद्र्य मिटवणे आपल्या सर्वाच्या हातात आहे त्यासाठी फक्त मनाची इच्छा शक्तीची गरज आहे. नुसती मलम पट्टी करुन जखम बरी होत नाही तर त्यासाठी औषध देखील खरेदी करुन घ्यावे लागतील तसेच आज आपण फक्त वंचित लोकांना सण आला म्हणून फराळ वाटप व कपडे वाटप करुन थोडी दिवाळी नक्की त्यांच्या साठी करा पण ह्या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी काय प्रयत्न करता येईल यावर खरे आत्मचिंतन झाले पाहिजे.

आज परिस्थिती बघितली तर सर्वसामान्य जनतेलाही जीवन जगणे कठीण होऊ लागले आहे. जीवनावश्यक वस्तुंचे भाव गगनाला भिडले तरी देखील सण आम्ही आंनदात साजरा करु हा खरा प्रामाणिकपणा सण साजरा करण्यासाठी ठेवतो तसा प्रामाणिकपणा प्रत्येक व्यक्तीने जर वंचित लोकांसाठी ठेवला तर नक्की त्यांच्या चेहर्‍यावरील आंनद तुम्हाला जगण्याची उमेद देईल म्हणतात, देव हा देवळात नसून माणसात आहे ..फक्त तो ज्यांने त्यांने शोधावा मग तो कुठे भेटेल हे कधीसांगता येणार नाही पण खरा परमेश्वर गरीब दीनदुबळ्या लोकांमध्ये आहे मी श्रीमंत आहे म्हणून मला माझे status सांभाळावे लागते हा Ego बाजूला ठेवला तर परिस्थिती नक्की बदलू शकते पण आपले तसे नाही. गरीब तो गरीब आणि श्रीमंत तो आधिक श्रीमंत होत आहे .ही दरी भरुन काढली पाहिजे. जे मिळते आहे ,त्यात समाधानी राहण्याची ताकद निर्माण झाली पाहिजे गरज पूर्ण होत असेल तर गरजवंताला ती पुढील मदत दिली पाहिजे पण हे सगळ्यांना शक्य होईल असे नाही परंतु जेवढे प्रत्येकाला शक्य होईल तेवढे प्रयत्न नक्की केले पाहिजे.

पाण्याच्या एक थेंबानेदेखील प्रवाह सुरु होऊ शकतो. तस प्रत्येकांच्या एका सहभागाने देखील प्रश्न सुटू शकतील. जे नाही आपुले त्यासे घ्यावे मानूनी सारे... जगी नाही सुखी कोणी श्रम करुन भरती पोट ध्यास असा समाजातील योगदानासाठी करुन सारे प्रयत्न बदल समाजातील घडण्यासाठी अशक्य ते शक्य करण्याची जिद्द असावी .ठेवला मनी ध्यास नाही कधी हार मानून उजळेल दिवा प्रकाशाचा देईल उजेड चोहीकडे, प्रश्न असे किती येतील.. नाही धीर सोडून खंबीर राहिल सामाना करण्यासाठी अडचणीतून देखील मार्ग काढून यशाची ती वाट मिळेल घेतला हा ध्यास वंचितांसाठी प्रकाशाची मळा गुंफण्याचा करतील सारे मदत पाऊल पुढे टाकून.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel