मनोहर महादेव भोसले
सैनिक टाकळी , ता.शिरोळ, जि.कोल्हापूर, 97670 44509
(सदर लेखकाचा इयत्ता 5 वी च्या "बालभारती" पाठय पुस्तकामध्ये "कठिण समय येता.." या शिर्षकाचा पाठ समाविष्ठ आहे.)
 
पक्का भामटा आहे
मित्र माझा.
टाकून रजा-करतो मजा.
पक्का भामटा आहे
मित्र माझा.

कामात व्यस्त असलेल्या मित्रांना
आपणच फोन करून बोलवतोय,
तासंतास
गप्पा मारत घालवतोय.
चहा वरून भडंग
भडंग वरून भजी
भजी वरून नाष्टा
नाष्टयावरून
जेवणाचा विषय कधी कोण काढतोय
तेंव्हाच याचा जीव भांडयात पडतोय.
पक्का भामटा आहे
मित्र माझा.

इथं नाही तिथं म्हणत
चार ढाबे फिरवतोय.
एक नाही दोन नाही
बघता बघता
अख्खी बाटली जिरवतोय.
टेबलावर
बील दयायची वेळ आली
की तोंड आपलं फिरवतोय.
पक्का भामटा आहे
मित्र माझा.

आज तुम्ही दया-उदया मी  देतो
असं म्हणंत-दररोज मित्रांचीच पितो.
कुणास ठाऊक याचा तो 'उदया'
कधी येतो ?

पक्का भामटा आहे.

हालत डूलत
रात्री उशीरा
घरी जेंव्हा जातो.
तेंव्हा-
चटईवर झोपायची
सजा त्याला मिळते.
आपल्याकडून
नकळत
चूक झाल्याचे कळते.

दुसऱ्या दिवशी सकाळी
बायकोनं
मौन धरलेलं पाहून नाराज होतो.
रात्रीचाच भात
पुन्हा फोडणी टाकून पुढयात येतो.
तेंव्हा जीवलग मित्रांना शिव्या देतो..
पक्का भामटा आहे
मित्र माझा.
टाकून रजा-करतो मजा.
पक्का भामटा आहे
मित्र माझा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel