कुराणात पुढे दिलेला संवाद देवदूत व देव ह्यांच्यामध्ये झाल्याचे लिहिले आहे.

देवदूत : प्रभो, या जगात दगडापेक्षा बलवान अशी कोणती वस्तू आहे का? सर्व वस्तू दगडावर पडून फुटतात, पण दगड मात्र अभंग राहतो.

देव : होय. देगडापेक्षा, खडकापेक्षा कठीण अशी वस्तू आहे. लोखंड हे खडकापेक्षा बलवान आहेण कारण लोखंडी घण खडकास फोडू शकतो.

देवदूत : लोखंडाहून प्रबळ अशी कोणती वस्तू आहे?

देव : लोखंडाहून अग्नी प्रबळ आहे; कारण अग्नी लोखंडाचा रस करू शकतो.

देवदूत : अग्नीपेक्षा प्रबळ काय आहे?

देव : पाणी हे अग्नीहून प्रबळ आहे. कारण पाणी आग विझवू शकते.

देवदूत : पाण्याहून प्रबळ कोण?

देव : पाण्याहून प्रबळ वारा आहे. पाण्यास वारा हलवू शकतो.

देवदूत : वायूहून प्रबळ काय आहे?

देव : पर्वत वायूस अडवू शकतात, म्हणून पर्वत हे वायूपेक्षा प्रबळ आहेत.

देवदूत : प्रत्येक वस्तूहून दुसरे काही तरी प्रबळ आहेच. सर्वांत प्रबळ असे काय आहे?

देव : उजवा हात काय देत आहे हे डाव्या हातासही माहीत नाही. अशा गुप्त रीतीने परोपकार करणारे, दान करणारे सदय अंतःकरण हे सर्वात श्रेष्ठ होय.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel