आतमधून हसण्याचे आवाज आले, "बघू तर खरं कोण वाचवतोय तुला? तो 'बाहेरचा तू' वाचवतो का तुला बघू! बाहेरचा तू खूप भेकड आहे, पळपूटा आहे, तो नाय दार उघडणार बघ!!" दरवाज्यावर जोरजोरात थपडा पडू लागल्या. काय करू? दरवाजा उघडू की नको? माझा चेहरा घामेघूम! अंगावर भीतीने शहारे आले!!! असा विचार करत असतांनाच पावणेचार वाजले आणि लॉजच्या माझ्या रूमच्या दरवाज्यावर बाहेरून थपडा पडू लागल्या. आता तर माझी भीतीने गाळणच उडाली. शरीरात प्रचंड भीतीची लहर!! काय प्रसंग आलाय हा माझ्या या आयुष्यात??