ऐरावती बहु थोर । त्याला अंकुशाचा मार ॥ १ ॥
व्याघ्र बहु भयंकर । त्याला सांपळा हो थोर ॥ २ ॥
सर्पविष हो विखार । मंत्रवल्ली केली थोर ॥ ३ ॥
देह जठराग्नी भारी । अन्नपाणी शांत करी ॥ ४ ॥
गुरु गैबीनाथ । नरहरी दास हा अंकित ॥ ५ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.