कृपाळु समर्था सद्गुरु अनंता । गुरु कृपावंता दया करीं ॥ १ ॥
अनाथ अपराधी तारी हा भवाब्धी । मृगजळ नदी तारी देखा ॥ २ ॥
दीनाचा दयाळु भक्तांचा कनवाळु । करितां सांभाळु हरिभक्ताचा ॥ ३ ॥
हरिनाम उच्चारी देव कृपा करी । भक्तांचा कैवारी पांडुरंग ॥ ४ ॥
कृपाळु भगवंते पुरविला हेत । मुखीं नामामृत नरहरी ॥ ५ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.