चित्तार्‍या चितरें काढी भिंतीवरी । तैसें जग सारे अवघे हें ॥ १ ॥

पोरें हो खेळती शेवटीं मोडिती । टाकूनियां जाती आपुल्या घरा ॥ २ ॥

तैसे जन सारे करिती संसार । मोहगुणें फार खरें म्हणती ॥ ३ ॥

कैसी जड माती चालविली युक्ति । नानापरी होती देह देवा ॥ ४ ॥

कांहीं साध्य करा साधुसंग धरा । नाम हें उच्चारा नरहरी म्हणे ॥ ५ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel