जग हें अवघें सारें ब्रह्मरूप । सर्वांभूतीं एक पांडुरंग ॥ १ ॥
अणुरेणू पर्यंत ब्रह्म भरीयेलें । सर्वांघटीं राहिलें अखंडित ॥ २ ॥
विश्व हें व्यापिलें भरूनी उरलें । कवतुक दाविलें मायाजाळ ॥ ३ ॥
भ्रांती मायाजाळ काढता तात्काळ । परब्रह्मीं खेळे अखंडित ॥ ४ ॥
अखंडित वस्तु ह्रदयीं बिंबली । गुरुकृपें पाहीं नरहरी ॥ ५ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.